बुधवार, २ जून, २०१०

मैत्री

मैत्री......... उत्कटपणे जगलेली, पाण्यावर मारलेल्या रेषेसारखी असते. ज्यावेळी ती जगता त्यावेळी अनंत लहरीउमटतात. तो moment संपला की उरते निरव शांतता ! छेडू त्यावेळी उमटणारया सतारीसारखी , वीणेसारखी ती असते.अवकाश असतो ती छेडण्याचा ! हे छेड्णारा आणि छेड्ण्यासाठी हवा असतो समोर कुणीतरी.......... हवी असते कुणीतरी.

मैत्री हे असं नातं आहे की यामध्ये संकोच नावाचा शब्दच लागू पडत नाही. स्वत:चे विचार, मतं, सल्लामसलतं, घरगुती अड्चणी यासारख्या कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने चर्चा करता यते.

जिथं खरं बोलल्यावर माफ़ केलं जाईल याची खात्री नसते ती मैत्री कसली? अंतरंग उघड करण्याची ती खात्रीची जागा असावी.

मैत्रीमध्ये समोरच्याची चिंता अन त्यातून आलेल्या अपेक्शा ( expectation ) कधीच असू नयेत.समस्या सोडविण्यासाठी मैत्री असते आणि नसतेही. कारण ज्याचं त्यालाच भोगायचं असतं.मैत्रीत असावा विश्वास समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नावरचा त्याच्या असण्यावरचा.......

हो तु समर्थ आहेस समस्या सोडविण्यास. तुझ्या प्रयत्नावर मला विश्वास आहे कितीही वेळा हरलास तरी अंतीमत: तू जिंकणारच........ इतका विश्वास मैत्रीमध्ये निर्माण व्हावा.

७ टिप्पण्या:

  1. मैत्री......... उत्कटपणे जगलेली, पाण्यावर मारलेल्या रेषेसारखी असते. ज्यावेळी ती जगता त्यावेळी अनंत लहरीउमटतात.

    फार छान लिहिलंय ..

    उत्तर द्याहटवा
  2. जिथं खरं बोलल्यावर माफ़ केलं जाईल याची खात्री नसते ती मैत्री कसली?....वा ! सगळच छान लिहील आहे!

    उत्तर द्याहटवा

Previous Post Next Post Back to Top