बुधवार, २ जून, २०१०

जीवन

"जीवन एक प्रवास आहे." या प्रवासात अनेक स्टेशन येतात. तेथे आगळ्या वेगळ्या व्यक्ती भेटतात. त्यांच्याशी सुख दु:खाचे नाते केव्हा जोडले जाते कळतच नाही.

जीवनात सुखाला आणि दु:खाला महत्वाचं स्थान आहे.कारण एका दु:खामुळे अनेक सुखापासून मिळणारे आनंदावर पाणी पडते. जीवनात सुख दु:ख येणारच. दु:खाने खचून आत्मनाश करण्याऎवजी दु:खाशी दोन हात करणे योग्य कारण "जो दु:खाने दु:खी होत नाही तो दु:खाला दु:खी करतो."

आपण इतरांना सुख दिलं तर ते सुखही आपल्यामागे सावलीप्रमाणे येत राहाते आणि आपण इतरांना जी दु:खे देतो तिच दु:खे कालांतराने मोगलीच्या बूमरंग सारखी बूमरंग होऊन आपल्याला छ्ळतात.

जीवन म्हणजे वर्तमानकाळ होय.जीवन ही मरणाविरुदध चाललेली अखंड लढाई आहे. आपण हत्यारे खाली ठेवली की मरण आपल्याला जिंकते. जीवनाकांशा हे सर्वात मोठं शस्त्र.अगदी मरणाच्या दाराशी जाऊन थबकलेली व्यक्ती जीवनाच्या दुर्दम्य लालसेने मरणावर मात करून उठ्ते आणि हि लढाई पुन्हा लढू लागते. म्हणूनच म्हणतात Man dies when he wants to die.

जीवनात येणारा प्रत्येक moment एकदाच येतो पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून जीवनातील प्रत्येक moment चा उपभोग मनापासून आनंदाने घ्यावा जीवनात प्रत्येकवेळी आनंदी असावं. मनात दु:ख असेल तरी चेहरा मात्र आनंदी ठेवावा कारण आजकाल लोकं फ़क्त चेहराच पहातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Back to Top