मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

हे करुन पहा

तुम्ही प्रामाणिक वागा म्हणजे जगातील एक बदमाश कमी होईल.(ऎकलेले वाक्य )

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

माधवराव पेशवे

काका मी तुम्हाला राज्याची वाटणी देवू शकत नाही कारण हे राज्य शिव छत्रपतींचे आहे आणि मी माधवराव पेशवा स्वराज्याचा फक्त पंतप्रधान आहे. स्वराज्य सांभळण्यासाठी, वाढवण्यासाठी, स्वराज्याचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी आणि रयतेला सुखी ठेवण्यासाठी मी आहे. स्वराज्य आपल्या राजेशाही उपभॊगासाठी नाही तर आपण प्रजेसाठी आहॊत, हि जाणिव असलेला पेशवा माधवराव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी लेखक रणजीत देसाई यांची स्वामी ही कादंबरी इतिहासकालीन असून वाक्यरचना मनॊरंजनात्मक आणि समजायला अतिशय सॊपी आहे.

माधवरावांना अगदी लहान वयातच स्वराज्याची जबाबदारी पार पार पाडावी लागली. वय कमी , अनुभव कमी तरीही स्वराज्यावर कितीही संकट आली तर त्यांना तोंड दिल्याशिवाय ती संपणार नाहीत याची जाणिव असल्यामुळेच माधवरावांचे नाव यशस्वी पेशव्यांमध्ये घ्यावेच लागेल.

स्वराज्याचा कारभार करत असताना स्वत:चे मामा मल्हारराव सस्ते यांना गुन्हेगार ठरवून [निजामाने पुणे लुटले तेव्हा मल्हारराव निजामा सोबत होते.] ५०००रुपयांचा दंड केला.हा दंड वसूल केला तर पाणी प्यायलाही ह्या वाड्यात थांबणार नाही असं म्हणणारी माधवरावांची आई गोपिकाबाई खरोखरचं मरेपर्यंत पुन्हा वाड्यात आल्या नाहीत. राजकारण भावनेवर चालत नाही तर ते कर्तव्यावर अधिष्टीत असतं याची जाणिव माधवरावांना होती.

निजामअली सोबत मैत्री झाल्यानंतर जेव्हा माधवराव त्यांना म्हणतात, "आपला स्नेह भविष्यात टिकला नाही तरी तुम्ही वेरुळ्च्या शिल्पाचे नुकसान करु नये खुप सुंदर शिल्प आहे ते.” यावरुन माधवरावांची रसिकता दिसून येते.

रघुनाथरावांनी माधवाला सांभाळण्याऎवजी माधवरावांनाच रघुनाथरावांना सांभाळावे लागले.मराठी साम्राज्य अटकेपर्यंत पोहचवणारे रघुनाथरावांना नजरकैद करावे लागले.म्हणून माधवराव म्हणतात निजामासारखे पिढीजात शत्रू आमचे मित्र बनले पण पित्रुतुल्य काका मला समजू शकले नाहीत.

रघुनाथराव माधवरावांवर चालून आले तेव्हा त्यांच्याबरोबर गंगोबातात्या हॊते म्हणून गंगॊबातात्यांना ३० लाखांचा दंड केला आणि रघुनाथरावांना व सखारामबापूंना फक्त नजरकैद.येथे माध्वरावांकडून न्याय झालाच नाही.

पर्वती उतरून आल्यावर रामसिंगाने माधवरावांवर वार केला तेव्हा श्रीपतीमुळे बेसावध माधवराव सावध झाले आणि तलवारीचा वार त्यांच्या डाव्या खांद्यावर बसला. खांदा रक्तभंबाळ झाला.माधवराव पेशवे मरता मरता वाचले.

माधवरावांचे मन कधी नाटकशाळेत रमले नाही किंवा पर स्त्रीचा त्यांना कधीच नाद नव्हता. पत्नी रमाबाई यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम हॊते. आयुष्याचे शेवटच्या घटकेला वेदना असह्य होत असताना रमाबाई सोबत असल्या की ते वेदना विसरून जात. मरणाच्या दारात असताना सुद्धा माधवरावांना काळजी होती स्वराज्याची आणि लहान बंधू नारायणरावांची......

मंगळवार, ८ जून, २०१०

काय? का? कसे ?

धावपळीचे जीवन जगत असताना आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातील काही निर्णय अतिशय महत्त्वाचे असतात. कारण त्यावर आपला भविष्यकाळ, आपलं करीअर अवलंबून असते.म्हणून एखादा धोरणात्मक निर्णय घेताना सर्व शक्यता पडताळून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी ध्येय्य असते. ज्याच्या जीवनात ध्येय्य नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. असेच ध्येय्य ठरवत असताना किंवा एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला मदत मिळते ती या प्रश्नांची काय? का? कसे ?

काय? --- मला नेमकं काय करायचं आहे.

का?----- हेच का करायचं आहे.

कसे?---- ते कश्याप्रकारे करायचे आहे.

ज्याचे हे तीन प्रश्न सुटले त्याला ध्येय्याप्रत पोहचण्यास वेळ लागणार नाही.

गुरुवार, ३ जून, २०१०

टारगेट

माझ्या मते टारगेट हा निखळ मनोरंजन करणारा एक चांगला मराठी चित्रपट आहे. ज्यामध्ये हास्य आहे, मस्ती आहे आणि सस्पेन्स आहे. मुळ कथेला कमी वाव असला तरी मनोरंजन छान आहे.

सर्वांच काम चांगलं असलं तरी संजय नार्वेकरची भूमिका निश्चीत छान आहे. चित्रपट पहिल्यानंतर असं वाटतं मराठी चित्रपटांचा दर्जा नक्कीच सुधरला आहे. चित्रपटात एकही गाणं चांगलं नाही ही मात्र चित्रपटातील कमतरता आहे.

चित्रपटाचा विषय मराठी मनाला स्पर्श करणारा आसला तरी शेवट असा झाल्यामुळे यातून अंधश्रदधा निर्मुलन कसं होणार, प्रशासनावर आणि न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांनी विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्नच पडतो .अंकुशचा शेवट मन दु:खी करतो. आणि त्याच्या friend च व्यसन संपलं की नाही हे समजत नाही. यातून काय संदेश घ्यावा ? असं असलं तरी मनोरंजन म्हणून चित्रपट पहाण्यासारखा आहे.

बुधवार, २ जून, २०१०

मैत्री

मैत्री......... उत्कटपणे जगलेली, पाण्यावर मारलेल्या रेषेसारखी असते. ज्यावेळी ती जगता त्यावेळी अनंत लहरीउमटतात. तो moment संपला की उरते निरव शांतता ! छेडू त्यावेळी उमटणारया सतारीसारखी , वीणेसारखी ती असते.अवकाश असतो ती छेडण्याचा ! हे छेड्णारा आणि छेड्ण्यासाठी हवा असतो समोर कुणीतरी.......... हवी असते कुणीतरी.

मैत्री हे असं नातं आहे की यामध्ये संकोच नावाचा शब्दच लागू पडत नाही. स्वत:चे विचार, मतं, सल्लामसलतं, घरगुती अड्चणी यासारख्या कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने चर्चा करता यते.

जिथं खरं बोलल्यावर माफ़ केलं जाईल याची खात्री नसते ती मैत्री कसली? अंतरंग उघड करण्याची ती खात्रीची जागा असावी.

मैत्रीमध्ये समोरच्याची चिंता अन त्यातून आलेल्या अपेक्शा ( expectation ) कधीच असू नयेत.समस्या सोडविण्यासाठी मैत्री असते आणि नसतेही. कारण ज्याचं त्यालाच भोगायचं असतं.मैत्रीत असावा विश्वास समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नावरचा त्याच्या असण्यावरचा.......

हो तु समर्थ आहेस समस्या सोडविण्यास. तुझ्या प्रयत्नावर मला विश्वास आहे कितीही वेळा हरलास तरी अंतीमत: तू जिंकणारच........ इतका विश्वास मैत्रीमध्ये निर्माण व्हावा.

जीवन

"जीवन एक प्रवास आहे." या प्रवासात अनेक स्टेशन येतात. तेथे आगळ्या वेगळ्या व्यक्ती भेटतात. त्यांच्याशी सुख दु:खाचे नाते केव्हा जोडले जाते कळतच नाही.

जीवनात सुखाला आणि दु:खाला महत्वाचं स्थान आहे.कारण एका दु:खामुळे अनेक सुखापासून मिळणारे आनंदावर पाणी पडते. जीवनात सुख दु:ख येणारच. दु:खाने खचून आत्मनाश करण्याऎवजी दु:खाशी दोन हात करणे योग्य कारण "जो दु:खाने दु:खी होत नाही तो दु:खाला दु:खी करतो."

आपण इतरांना सुख दिलं तर ते सुखही आपल्यामागे सावलीप्रमाणे येत राहाते आणि आपण इतरांना जी दु:खे देतो तिच दु:खे कालांतराने मोगलीच्या बूमरंग सारखी बूमरंग होऊन आपल्याला छ्ळतात.

जीवन म्हणजे वर्तमानकाळ होय.जीवन ही मरणाविरुदध चाललेली अखंड लढाई आहे. आपण हत्यारे खाली ठेवली की मरण आपल्याला जिंकते. जीवनाकांशा हे सर्वात मोठं शस्त्र.अगदी मरणाच्या दाराशी जाऊन थबकलेली व्यक्ती जीवनाच्या दुर्दम्य लालसेने मरणावर मात करून उठ्ते आणि हि लढाई पुन्हा लढू लागते. म्हणूनच म्हणतात Man dies when he wants to die.

जीवनात येणारा प्रत्येक moment एकदाच येतो पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून जीवनातील प्रत्येक moment चा उपभोग मनापासून आनंदाने घ्यावा जीवनात प्रत्येकवेळी आनंदी असावं. मनात दु:ख असेल तरी चेहरा मात्र आनंदी ठेवावा कारण आजकाल लोकं फ़क्त चेहराच पहातात.
Back to Top