बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

माधवराव पेशवे

काका मी तुम्हाला राज्याची वाटणी देवू शकत नाही कारण हे राज्य शिव छत्रपतींचे आहे आणि मी माधवराव पेशवा स्वराज्याचा फक्त पंतप्रधान आहे. स्वराज्य सांभळण्यासाठी, वाढवण्यासाठी, स्वराज्याचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी आणि रयतेला सुखी ठेवण्यासाठी मी आहे. स्वराज्य आपल्या राजेशाही उपभॊगासाठी नाही तर आपण प्रजेसाठी आहॊत, हि जाणिव असलेला पेशवा माधवराव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी लेखक रणजीत देसाई यांची स्वामी ही कादंबरी इतिहासकालीन असून वाक्यरचना मनॊरंजनात्मक आणि समजायला अतिशय सॊपी आहे.

माधवरावांना अगदी लहान वयातच स्वराज्याची जबाबदारी पार पार पाडावी लागली. वय कमी , अनुभव कमी तरीही स्वराज्यावर कितीही संकट आली तर त्यांना तोंड दिल्याशिवाय ती संपणार नाहीत याची जाणिव असल्यामुळेच माधवरावांचे नाव यशस्वी पेशव्यांमध्ये घ्यावेच लागेल.

स्वराज्याचा कारभार करत असताना स्वत:चे मामा मल्हारराव सस्ते यांना गुन्हेगार ठरवून [निजामाने पुणे लुटले तेव्हा मल्हारराव निजामा सोबत होते.] ५०००रुपयांचा दंड केला.हा दंड वसूल केला तर पाणी प्यायलाही ह्या वाड्यात थांबणार नाही असं म्हणणारी माधवरावांची आई गोपिकाबाई खरोखरचं मरेपर्यंत पुन्हा वाड्यात आल्या नाहीत. राजकारण भावनेवर चालत नाही तर ते कर्तव्यावर अधिष्टीत असतं याची जाणिव माधवरावांना होती.

निजामअली सोबत मैत्री झाल्यानंतर जेव्हा माधवराव त्यांना म्हणतात, "आपला स्नेह भविष्यात टिकला नाही तरी तुम्ही वेरुळ्च्या शिल्पाचे नुकसान करु नये खुप सुंदर शिल्प आहे ते.” यावरुन माधवरावांची रसिकता दिसून येते.

रघुनाथरावांनी माधवाला सांभाळण्याऎवजी माधवरावांनाच रघुनाथरावांना सांभाळावे लागले.मराठी साम्राज्य अटकेपर्यंत पोहचवणारे रघुनाथरावांना नजरकैद करावे लागले.म्हणून माधवराव म्हणतात निजामासारखे पिढीजात शत्रू आमचे मित्र बनले पण पित्रुतुल्य काका मला समजू शकले नाहीत.

रघुनाथराव माधवरावांवर चालून आले तेव्हा त्यांच्याबरोबर गंगोबातात्या हॊते म्हणून गंगॊबातात्यांना ३० लाखांचा दंड केला आणि रघुनाथरावांना व सखारामबापूंना फक्त नजरकैद.येथे माध्वरावांकडून न्याय झालाच नाही.

पर्वती उतरून आल्यावर रामसिंगाने माधवरावांवर वार केला तेव्हा श्रीपतीमुळे बेसावध माधवराव सावध झाले आणि तलवारीचा वार त्यांच्या डाव्या खांद्यावर बसला. खांदा रक्तभंबाळ झाला.माधवराव पेशवे मरता मरता वाचले.

माधवरावांचे मन कधी नाटकशाळेत रमले नाही किंवा पर स्त्रीचा त्यांना कधीच नाद नव्हता. पत्नी रमाबाई यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम हॊते. आयुष्याचे शेवटच्या घटकेला वेदना असह्य होत असताना रमाबाई सोबत असल्या की ते वेदना विसरून जात. मरणाच्या दारात असताना सुद्धा माधवरावांना काळजी होती स्वराज्याची आणि लहान बंधू नारायणरावांची......
Previous Post Next Post Back to Top